पाच चेंडू घेऊन एकाच वेळी हवेत उडवून सारे दोन्ही हातांनी झेलण्याचा खेळ
पाहिलाय का तुम्ही.? एका वेळी ३ चेंडू हवेत, २ हातात असा बॅलन्स साधणारा
तो खेळाडू किती एकचित्ताने आणि आत्यंतिक सरावाने खेळत असतो. आता कल्पना
करा, की तो खेळाडू म्हणजे तुम्ही स्वत.! तुमच्या हातात दिलेत असे ५
चेंडू. अट एकच, सगळे हवेत उडवायचे आणि न पाडता झेलत रहायचे. एक जरी खाली
पडला तरी खेळ खतम. आता तुम्ही विचाराल ते चेंडू कोणते.?
१) काम.
२) कुटुंब.
३) तब्येत.
४) मित्रमैत्रिणी.
५) झगडण्याची वृत्ती.
-लागा आता खेळायला. केली सुरुवात. एकदा हे चेंडू हवेत फेकले. झेलले की
लक्षात येईल की या पाच चेंडूत एक चेंडू असा आहे जो जमिनीवर पडलाच
चुकूनमाकून तर अधिक जोरात उसळून अंगावर येतो. येऊन आदळतोच आपल्यावर.
हातातले सारे चेंडू सोडून तोल सावरत त्या उसळलेल्या चेंडूला पकडावे
लागते. तो चेंडू कोणता.? काम. त्या चेंडूचं नाव काम.
तुम्ही ते काम आवडीनं करा, नाहीतर हलगर्जीपणा करा. काम तितक्याच वेगानं
तुमच्यावर येऊन आदळतं. नोकरी करत असाल तर विचारायलाच नको.सतत एकामागून एक
कामं आपण करत राहतो. पण मग बाकीच्या चार चेंडूंचं काय होतं.? खरं सांगू
काम नावाचा हा चेंडू म्हणजे रबर बॉल. जेवढा आदळतो तेवढा उसळतो. पण हे उरलेले
चार चेंडू आहेत ना, ते आहेत काचेचे. ते एकदा जमिनीवर पडले की टचकन
फुटतात. तुकडे तुकडे होतात. आणि एकदा का ते तुकडे विखुरले की, त्यांचा
पुन्हा पूर्वीसारखा चेंडू काही केल्या होत नाही. मग होतं काय, काम नावाचा
चेंडू आपण सरावानं झेलत राहतो. बाकीचे चेंडू मात्र कधी फुटतात कळतही
नाही. स्वतच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. घरातली माणसं नाराज होतात,
दुरावतात. आपल्या आतला एकटेपणा वाढत जातो. मित्रमैत्रिणी तुटतात.
साधेसाधे आनंद दुर्लभ होतात. आणि रुटीन काम करण्यात आणि त्यातून किती
पैसे मिळतात हे शोधण्याच्या नादात आपली झगडण्याची वृत्तीही लोप पावते.!
आता कोणी म्हणेल की, बघा सतत काम केल्यानं हे असं होतं. पण असा विचार
करणं साफ चूक. चेंडू आपल्या हातात असतात. आपण खेळाचे नियम विसरतो, सगळे
चेंडू सारख्याच वेगानं उडवण्याचा आणि झेलण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा
आहे. आपण एकाच चेंडूवर लक्ष केंद्रित करतो, एकच चेंडू झेलतो आणि बाकीच्या
सगळ्या चेंडूवरचं लक्षच काढून घेतो. यात त्या चेंडूची काय चूक.? पण मग हा
'बॅलन्स' नावाचा अवघड खेळ खेळायचा कसा.?
नियम क्र.१
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतचा खेळ खेळायला लागा.! तुमच्या
अवतीभवती सगळेच हा खेळ खेळताहेत. मग त्यांच्याकडे कशाला पाहायचं. त्यांना
बॅलन्स जमतो का नाही हे पाहणं, त्यांच्याशी स्पर्धा करणं हे आपलं काम
नाही. आपण सगळं लक्ष आपल्या हातात असलेल्या चेंडूवर केंद्रित केलेलं
बरं.! हे करताना एक लक्षात ठेवायचं की, प्रत्येकाची हा खेळ खेळण्याची
ताकद, वेग, एकचित्त होण्याची क्षमता, तोल सांभाळण्याचा सराव हे सारं
वेगवेगळं असतं. आपण इतरांसारखं करायला गेलो की तोल गेलाच.!
नियम क्र.२

इतर लोकांचे ध्येय काहीही असू शकते. ते स्वतची ध्येय ठरवतात. त्याप्रमाणे
कुठल्या चेंडूला अधिक महत्त्व द्यायचं याचा विचार करतात. आपण त्यांच्या
ध्येयांच्या प्रायॉरिटीकडे कशाला पाहायचं. त्यापेक्षा आपण आपली ध्येय
ठरवावी, चेंडूला आवश्यक तो वेग द्यावा, ते सोपं. आपल्यासाठी काय
महत्त्वाचं हे फक्त आपणच ठरवू शकतो, लोक नाही. आणि जे त्यांच्यासाठी
महत्त्वाचं ते आपल्यासाठी महत्त्वाचं असेलच असंही नाही.
नियम क्र.३
हा खेळ खेळताना आणखी एक गोष्ट करायची, स्वतशी खोटं बोलायचं नाही. कदाचित
असं होईल की, या ५ चेंडूंपैकी एखादा चेंडू तुम्हाला अधिक महत्त्वाचा
वाटेल. इतरांना नाही वाटणार तसं. पण जर तुमचं मन म्हणत असेल की, यापैकी
एक चेंडू हीच महत्त्वाची गोष्ट आहे तर ते मान्य करा. उगीच स्वतला फसवू
नका. तसं केलं तर तुम्ही खेळात तर रहाल; पण जगण्यातला आनंद निघून जाईल.
नियम क्र.४
हा खेळ खेळताना अनेकदा होतं काय की आपली तंद्री लागते. आपण आधी खेळत होतो
तेव्हा कसे जिंकलो, कसे हरलो, लोकांनी आपलं कसं कौतुक केलं किंवा आपण
जिंकलो की लोक कसं आपलं भरभरून कौतुक करतील, अशा नादात आपण हरवून जातो.
परिणाम व्हायचा तोच होतो. हातातल्या चेंडूवरचं लक्ष उडतं. स्वतच्या
चेंडूपेक्षा इतरांचे चेंडू अधिक आकर्षक वाटायला लागतात. नाही तर जमतंय
आपल्याला म्हणत आपण गृहीत धरतो स्वतला.! त्या दरम्यान हातातले चेंडू
निसटून जातात, आणि आपण खेळातून बाद झालेलो असतो.
नियम क्र.५

तुम्ही खेळणं थांबवत नाही तोपर्यंत हा खेळ थांबत नाही. त्यामुळे वेग कमी
झाला तुमचा किंवा इतर लोक अधिक वेगानं पुढं निघाले तरी घाबरायचं काही
कारण नाही. तुम्ही खेळणं थांबवत नाही तोपर्यंत या खेळात तुमची हार होत
नाही. त्यामुळे काहीही झालं तरी खेळ बंद करायचा नाही. तो केला की हरलाच
तुम्ही.!
नियम क्र.६
हे मान्य करून टाकायचं की, आपण काही परफेक्ट नाही. परफेक्ट नसलं तरी काही
बिघडत नाही. आपण परफेक्ट नाही, आपल्याला जमत नाही, असं समजून अनेक जण
चेंडूवरचं लक्षच काढून घेतात. त्यापेक्षा जमेल आपल्याला करू प्रयत्न,
जमेल हळूहळू बॅलन्स असं मान्य केलं की मग या खेळात रंगत यायला लागते.
नियम क्र.७
अनेक जणांचं काम या चेंडूवरच सगळं लक्ष केंद्रित होतं. प्रेमबिम सब झूठ
असं म्हणत ते भावना, नातं याकडे दुर्लक्ष करतात. त्यावर लक्ष दिलं तर
कामावर, करिअरवर परिणाम होईल असं त्यांना वाटतं. पण असं केलं तर खेळाचा
तोल जातो. प्रेम नावाचा चेंडू बांधून ठेवत नाही उलट वेग देतो या
खेळाला.त्यात खरे रंग भरतो.
नियम क्र.८
काही जण बाकीचं सारं सोडून प्रेम नावाचा चेंडू पकडायला जातात. पण चेंडू
म्हणजे पारा. तुम्ही त्याला जितकं पकडाल तितका तो हातातून निसटतो.
त्यापेक्षा त्या चेंडूला हवेत मुक्त उडू द्या.त्याला पंख द्या.तसं केलं
तरच तो तुमच्या हाताशी लागतो.नाहीतर घसरतोच हातातून.!
नियम क्र.९
तब्येत नावाच्या चेंडूकडे तारुण्यात प्रचंड दुर्लक्ष होतं. त्याला गृहीत
धरलं जातं. तो चेंडू सुटला तर सुटलाच.मग कितीही किंमत मोजली तरी तो परत
येत नाही.
नियम क्र.१0
सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा नियम, आयुष्य म्हणजे हा खेळ जिंकण्याची
स्पर्धा नव्हे. आपण आपला खेळ आपल्या पद्धतीने खेळावा, एन्जॉय करावा.
स्पर्धेत धावायला लागलं की चेंडूवरचं लक्ष सुटतं आणि पायांच्या वेगावर
लागतं, तेही इतरांच्या.त्यामुळे तुम्ही ठरवा, महत्त्वाचं काय. चेंडू.तोल
की स्पर्धा.
No comments:
Post a Comment